Skip to main content

कसं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ENGINEERING ?

नमस्कार मंडळी ,
राम राम,
              छत्रपती शिवाजी महाराज हे महान व्यक्तिमत्त्व !!! त्यांच्याबद्दल ऐकल्यावर, वाचल्यावर , चित्रपट पाहिल्यावर एक गोष्ट मात्र कळून चुकली कि,
                                                            Image result for shivaji maharaj
              शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ !!!
           अशाच एका पेक्षा एक युक्त्या लढवून महाराजांनी महाबलाढ्य सत्तांना धूळ चारली, स्वराज्य स्थापन केले. याकाळा मध्ये त्यांनी बऱ्याच तंत्रज्ञानाचा, कौशल्याचा वापर केला. कधी कधी वाटत त्या काळातील काही पद्धती आतापेक्षा दोन पाऊले पुढेच होत्या.
           मग त्यात  कमी उंचीच्या मावळ्यासाठी जास्त लांबीच्या तलवारी बनवणे, जमिनीखाली कमी खोलीवर पाणी शोधण्याची पद्धत , मोठमोठाले दगड अगदी सोप्यापद्धतीने फोडण्याची कला, निसर्गात उपलब्ध असलेल्या वस्तूपासून हत्यारे तयार करण्याचे ज्ञान या व अशा अनेक अफलातून युक्त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी धूर्तपणे स्वराज्यस्थापनेत अंमलात आणल्या.
              छत्रपती शिवाजी महाराजांच्या या काळातल्या ENGINEERING चं प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी अगदी उत्कृष्टरित्या वर्णन केलेले आहे  आणि जर तुम्हाला खरंच ते समजून उमजून घ्यायचा असेल तर ही चित्रफीत नक्की पहा थोडी लांबी जास्त आहे चित्रफितीची पण गरजेची आहे.


             
         अहो,स्थापत्यशास्त्राबद्दल बोलायचं म्हटलं तर हिरोजी इंदूलकरांनी रायगडसारख्या अशक्य किल्ल्याची बांधणी करून भल्याभल्यांना भुवया उंचवायला भाग पाडलं. फक्त रायगडच काय तर राजगड, पन्हाळगड, हरिहरेश्वर असे अनेक किल्ले मी पाहिलेले खूपच मनमोहक आणि चित्तथरारक !!!   
                     
                              Image result for raigad

बा रायगड 

           आता काय, ENGINEERING मध्ये लेखी परीक्षेच्या नावाखाली पोपटपंची करायची आणि प्रात्यक्षिक च्या नावाखाली प्रयोगवह्या भरायच्या बाकी काय नाय. ढकलत ढकलत पुढे जायचं.
           असो तुम्हाला एक सांगणं आहे , एखादवेळी सुट्टी वैगेरे असल्यावर गडकिल्ल्यांना भेट देत चला.हो पण तिथे गेल्यावर त्या ऐतिहासिक वास्तूला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्या ओ.
           एक गोष्ट खरी ...

          छत्रपती शिवाजी महाराज !! ग्रेट ENGINEER !! MANAGEMENT गुरु !!!

         

Comments

Popular posts from this blog

या ७ प्रकारचे नमुने तुम्ही ( GYM ) व्यायामशाळेत पहिलेच असतील ??? फर्जंद मराठी चित्रपट !!!

नमस्कार मंडळी , राम राम,           कसं आहे  ना मित्रांनो ....सध्या शरीरसौष्ठत्वाची वेगळीच झिंग आपल्याला मानवजातीमध्ये पहायला मिळत आहे.ज्याला त्याला बाॅडी बनवायची आहे.आईने एखादं काम सांगितल्यावर झिनकारा येणारी पोरं बी गुरासारखं राबत्यात ओ...ते बी पैसं देऊन.एखाद्या इंजिनिअरला म्हणजे मलापण एकेकाळी GYM ची लहर आली होती.या संपूर्ण शैक्षणिक काळामध्ये प्रत्येक गाबड्याला आपण पण कधीतरी जिम करावी अस वाटतयंच.तसा मी शरीररचनेने मध्यम होतो.पण घेतलं अॅडमिशन. संपूर्ण महाराष्ट्राने फर्जंद चित्रपटाला चांगली पसंती दर्शिवली होती. तरुणवर्गाला त्यातील नायकाचं शरीरसौष्ठत्व भुरळ पाडणारं होतं.आता फर्जंद चित्रपट तुम्ही आता ऑनलाइन पाहू शकता.त्याची लिंक खाली दिली आहे.   https://todaypk.stream/watch-farzand-2018-dvdscr-marathi-full-movie-online-free-download.html GYM खरं तर सुरूवातीला मला व्यायाम कमी पण मनोरंजकच वाटू लागली. कारण प्रत्येक जण आपल्याच दुनियेत....फुल्ल अतरंगी !!! मला काही एकापेक्षा एक ताडतुडी मानवजात बघायला भेटली.त्यापैकीच काही खाली नमूद...

ENGINEERING (अभियांत्रिकी शिक्षण)... खतरनाक अनुभव !!!!

नमस्कार मंडळी , राम राम,          स्वागत आहे तुमचं या आगळ्यावेगळ्या पेजवर जिथं तुम्हाला उपयुक्त असा काहीएक अवगत होणार नाही. पण जर तुम्ही रोजच्या छळाला तुमच्या बायकोच्या किंवा नवर्याच्या तसेच बॉसच्या किंवा शिक्षकांच्या बाहेरवश्याला कंटाळला असाल तर ह्या पेजला भेट देणं हि काळाची गरज आहे.           तर आज आपल्या चर्चेचा विषय आहे इंजिनिअरिंग !!           इंजिनिअरिंग शिक्षण हे असं शिक्षण आहे जिथे तुम्ही ठरवल्याप्रमाणे काहीच होत नाही..म्हणजे जर तुम्ही इंजिनिअरिंग नंतर चांगल्या पगाराची नोकरी अपेक्षित करत असाल...तर तुम्ही त्यापासून भरकटले जाणार. शब्द आहे आपला ....अनुभवाचे बोल !! एक  इंजिनिअर त्याच्या आयुष्यात सगळं काही करेल ..पण दुसऱ्यांना इंजिनिअरिंग कर असा सल्ला देण्याचं  पाप कधीच करणार नाही !!!!           असो या सर्व प्रवासाची सुरुवात होते, बारावी चा निकाल लागल्या नंतर....कारण सगळ्याच गाबडयांना प्रश्न पडलेला असतो कि पुढे करायचा काय ?? त्यात ४ पर्याय असतात ...B.Sc , मेडिकल, इंज...