Skip to main content

या ७ प्रकारचे नमुने तुम्ही ( GYM ) व्यायामशाळेत पहिलेच असतील ??? फर्जंद मराठी चित्रपट !!!

नमस्कार मंडळी ,
राम राम,

         कसं आहे ना मित्रांनो ....सध्या शरीरसौष्ठत्वाची वेगळीच झिंग आपल्याला मानवजातीमध्ये पहायला मिळत आहे.ज्याला त्याला बाॅडी बनवायची आहे.आईने एखादं काम सांगितल्यावर झिनकारा येणारी पोरं बी गुरासारखं राबत्यात ओ...ते बी पैसं देऊन.एखाद्या इंजिनिअरला म्हणजे मलापण एकेकाळी GYM ची लहर आली होती.या संपूर्ण शैक्षणिक काळामध्ये प्रत्येक गाबड्याला आपण पण कधीतरी जिम करावी अस वाटतयंच.तसा मी शरीररचनेने मध्यम होतो.पण घेतलं अॅडमिशन.

संपूर्ण महाराष्ट्राने फर्जंद चित्रपटाला चांगली पसंती दर्शिवली होती. तरुणवर्गाला त्यातील नायकाचं शरीरसौष्ठत्व भुरळ पाडणारं होतं.आता फर्जंद चित्रपट तुम्ही आता ऑनलाइन पाहू शकता.त्याची लिंक खाली दिली आहे. 

https://todaypk.stream/watch-farzand-2018-dvdscr-marathi-full-movie-online-free-download.html

GYM खरं तर सुरूवातीला मला व्यायाम कमी पण मनोरंजकच वाटू लागली. कारण प्रत्येक जण आपल्याच दुनियेत....फुल्ल अतरंगी !!!

Related image

मला काही एकापेक्षा एक ताडतुडी मानवजात बघायला भेटली.त्यापैकीच काही खाली नमूद करतो...

१.बघ्या
GYM मध्ये आगमन केल्यावर ह्याला बघ त्याला बघ.सगळ्यांना बघुन झाल्यावर आरशात बघ.

२.प्रेषक 
कोणीपण येऊद्या GYM मध्ये हा गडी स्वागत करायला तयार.एक वाक्य त्याच्या तोंडून नेहमी निघणार "काय बोलतो भावा".काय बरं वाटतं बेण्याला काय माहित.

३.कुतूकुतून बोंबलनारा:
आयुष्यभराचा व्यायाम एकाच दिवशी करायचा या हेतूने हे मनुष्य येतात. निरनिराळे अविष्कारी आवाज  काढतात. लय वंगाळ....

४.गप्पेबाज
हे लोक दिवसभराची एक एक घडामोड डोक्यात घेऊन येतात आण GYM मध्ये त्यावर टेपा लावतात.नुसत्या चुगल्या.

५.महाज्ञानी
या मानवाला भयंकर आवड दुसर्याच्या चुका काढायची.स्वतःचं शरीर तर नुसता सापळा पण लय वाईट खाज.बिचारं प्रशिक्षकाच्या पण चुका काढतं कधीकधी.

६.कसं करू
ह्या लोकांना एकाचं ऐकुन पटत नाय. सदैव साशंक.

७.माझ्यासारखे
आपला व्यायाम भला आणि आपण भलं.एकाच गोष्टीचं भान ठेवणारे की वरील नमुद केलेल्या मनुष्यांच्या संगतीत राहून त्यांची मजा घेणे.

वाचकांनो जर तुम्हाला पोस्ट आवडत असतील तर like आणि share करत चला आणि टिप्पण्या पण करा लय अवघड नाय.

Comments

Popular posts from this blog

कसं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ENGINEERING ?

नमस्कार मंडळी , राम राम,               छत्रपती शिवाजी महाराज हे महान व्यक्तिमत्त्व !!! त्यांच्याबद्दल ऐकल्यावर, वाचल्यावर , चित्रपट पाहिल्यावर एक गोष्ट मात्र कळून चुकली कि,                                                                            शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ !!!            अशाच एका पेक्षा एक युक्त्या लढवून महाराजांनी महाबलाढ्य सत्तांना धूळ चारली, स्वराज्य स्थापन केले. याकाळा मध्ये त्यांनी बऱ्याच तंत्रज्ञानाचा, कौशल्याचा वापर केला. कधी कधी वाटत त्या काळातील काही पद्धती आतापेक्षा दोन पाऊले पुढेच होत्या.            मग त्यात  कमी उंचीच्या मावळ्यासाठी जास्त लांबीच्या तलवारी बनवणे, जमिनीखाली कमी खोलीवर पाणी शोधण्याची पद्धत , मोठमोठाले दगड अगदी सोप्यापद्धतीने फोडण्याची कला, निसर्गात ...

ENGINEERING (अभियांत्रिकी शिक्षण)... खतरनाक अनुभव !!!!

नमस्कार मंडळी , राम राम,          स्वागत आहे तुमचं या आगळ्यावेगळ्या पेजवर जिथं तुम्हाला उपयुक्त असा काहीएक अवगत होणार नाही. पण जर तुम्ही रोजच्या छळाला तुमच्या बायकोच्या किंवा नवर्याच्या तसेच बॉसच्या किंवा शिक्षकांच्या बाहेरवश्याला कंटाळला असाल तर ह्या पेजला भेट देणं हि काळाची गरज आहे.           तर आज आपल्या चर्चेचा विषय आहे इंजिनिअरिंग !!           इंजिनिअरिंग शिक्षण हे असं शिक्षण आहे जिथे तुम्ही ठरवल्याप्रमाणे काहीच होत नाही..म्हणजे जर तुम्ही इंजिनिअरिंग नंतर चांगल्या पगाराची नोकरी अपेक्षित करत असाल...तर तुम्ही त्यापासून भरकटले जाणार. शब्द आहे आपला ....अनुभवाचे बोल !! एक  इंजिनिअर त्याच्या आयुष्यात सगळं काही करेल ..पण दुसऱ्यांना इंजिनिअरिंग कर असा सल्ला देण्याचं  पाप कधीच करणार नाही !!!!           असो या सर्व प्रवासाची सुरुवात होते, बारावी चा निकाल लागल्या नंतर....कारण सगळ्याच गाबडयांना प्रश्न पडलेला असतो कि पुढे करायचा काय ?? त्यात ४ पर्याय असतात ...B.Sc , मेडिकल, इंज...