नमस्कार मंडळी ,
राम राम,
स्वागत आहे तुमचं या आगळ्यावेगळ्या पेजवर जिथं तुम्हाला उपयुक्त असा काहीएक अवगत होणार नाही. पण जर तुम्ही रोजच्या छळाला तुमच्या बायकोच्या किंवा नवर्याच्या तसेच बॉसच्या किंवा शिक्षकांच्या बाहेरवश्याला कंटाळला असाल तर ह्या पेजला भेट देणं हि काळाची गरज आहे.
तर आज आपल्या चर्चेचा विषय आहे इंजिनिअरिंग !!
इंजिनिअरिंग शिक्षण हे असं शिक्षण आहे जिथे तुम्ही ठरवल्याप्रमाणे काहीच होत नाही..म्हणजे जर तुम्ही इंजिनिअरिंग नंतर चांगल्या पगाराची नोकरी अपेक्षित करत असाल...तर तुम्ही त्यापासून भरकटले जाणार. शब्द आहे आपला ....अनुभवाचे बोल !!
एक इंजिनिअर त्याच्या आयुष्यात सगळं काही करेल ..पण दुसऱ्यांना इंजिनिअरिंग कर असा सल्ला देण्याचं पाप कधीच करणार नाही !!!!
असो या सर्व प्रवासाची सुरुवात होते, बारावी चा निकाल लागल्या नंतर....कारण सगळ्याच गाबडयांना प्रश्न पडलेला असतो कि पुढे करायचा काय ?? त्यात ४ पर्याय असतात ...B.Sc , मेडिकल, इंजिनिअरिंग , नायतर चहाची टपरी. B .Sc आणि चहाची टपरी याला तर आधी आपण फाट्यावर मारतो. पण नंतर हेच शिकलेले पुढं जाऊन मोठे मोठे तीर मारतेत. एकतर बारावीला जीवशास्त्र शिकून
वेगवेगळ्या आजाराची नाव ऐकून मेडिकलच आधीच भ्या असतंय.
आणि अशाच फाटफाटीच्या वेळी तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येते जी उरल्यासुरल्या आयुष्याला चुना आणि घोडा लावते.हि व्यक्ती कोणीपण असू शकते , काका ,मामा, शेजारीपाजारी, जे तुम्हाला सांगतात कि बाळा "घे मग आता इंजिनिअरिंग ला ऍडमिशन .लय स्कोप आहे. " जो कोणी असा तुम्हाला सल्ला देईल ना समजून जावा .हा सल्ला त्यानी तुमच्या वडिलासोबतच्या पूर्व वैमनस्यातून दिला आहे. कदाचित जमिनीचे वाद असतील, तुमचा शेतीतील उत्पन्न जास्त असेल, किंवा तुमच्या विहिरीला सगळ्यात जास्त पाणी असेल..असच काहीतरी. मग त्या पोराच्या हसत्याखेळत्या सरळ आयुष्यात घाट सुरु होतो.
पुढे मग चार वर्षाचा प्रवास. आठ सत्र परीक्षा , १६चाचण्या , ५० विषय, असाइनमेंट, प्रॅक्टिकल्स
प्रोजेक्ट्स , रिपोर्ट्स , पोरींचा नाद, नुसता चकणाचुर होतो त्या भोळ्या जीवाचा......लई वाईट!!!!!
या प्रवासाचा अंत महा वंगाळ असतो. काहीजण फोटोग्राफर होतात , काही musically वर करिअर करतात, तर कोणी PUBG च्या नादाला लागतंय, कोणी आपल्या बापाच्या धंद्यात एन्ट्री करून त्या धंद्या ला इतिहास बनवतंय. आन जर कोणी लयच मनावर घेतला तर तर कुठे एखाद बेणं पास होतंय आणि घरी बसून चार टाइम जेवायचं काम करताय .अगदी माझ्यासारखं.
अजून खोलात जाऊ आपण पुढील वेळी वेगळ्या मुद्द्यांवर ...या वरील लेखावर बरेच जण टिप्पण्या करतील ..पण एक सांगणं आहे त्यांना .....
ज्याचं जळतं त्यालाच कळतं !!!

Comments
Post a Comment